त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी जेथे शिष्य होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, “तुम्हांला शांती असो.” असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखवली; तेव्हा प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला. येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “तुम्हांला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हांला पाठवतो.” असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकली आणि त्यांना म्हटले, “पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्यांची क्षमा झाली आहे; आणि ज्या कोणाची तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.” येशू आला तेव्हा बारा जणांतील एक म्हणजे दिदुम1 म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसर्या शिष्यांनी त्याला सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” पण त्याने त्यांना म्हटले, “त्याच्या हातांत खिळ्यांचे वण पाहिल्यावाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यावाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्यावाचून मी विश्वास धरणारच नाही.”
योहान 20 वाचा
ऐका योहान 20
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 20:19-25
7 दिवस
जेव्हा कोणाचा छळ होतो तेव्हा भिती ही सर्वात शक्तिशाली भावना असते. हल्ले, तुरूंगवास, मंडळ्या बंद करणे आणि प्रिय व्यक्तिंचे व सह विश्वासणा-यांचे विश्वासामूळे मरण होणे या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या ख्रिस्ती विश्वासाच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी भितीदायक वाटण्यास व असहाय वाटण्यास कारण ठरू शकतात. जर तुम्हाला आता त्याची भिती वाटत असेल तर ही वाचन योजना जेव्हा तुम्ही छळाचा सामना कराल त्यासाठी तयारी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ