YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 19:19-24

योहान 19:19-24 MARVBSI

पिलाताने पाटी लिहून वधस्तंभावर लावली; तिच्यावर “यहूद्यांचा राजा नासोरी येशू” असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले ते स्थळ नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी ती पाटी वाचली. ती इब्री, रोमी व हेल्लेणी ह्या भाषांत लिहिली होती. तेव्हा यहूद्यांचे मुख्य याजक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका, तर ‘मी यहूद्यांचा राजा आहे असे त्याने म्हटले,’ असे लिहा.” पिलाताने उत्तर दिले, “मी जे लिहिले ते लिहिले.” शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एकेक वाटा असे चार वाटे केले; त्यांनी अंगरखाही घेतला. त्या अंगरख्याला शिवण नसून तो वरपासून खालपर्यंत सबंध विणलेला होता. म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल हे चिठ्ठ्या टाकून पाहावे;” हे ह्यासाठी झाले की, “त्यांनी माझे कपडे आपसांत वाटून घेतले आणि माझ्या वस्त्रांवर चिठ्ठ्या टाकल्या,” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले.