YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 18:33-38

योहान 18:33-38 MARVBSI

तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “आपण स्वतः होऊन हे म्हणता किंवा दुसर्‍यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले?” पिलाताने उत्तर दिले, “मी यहूदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले; तू काय केलेस?” येशूने उत्तर दिले, “माझे राज्य ह्या जगाचे नाही, माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” ह्यावरून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.” पिलात त्याला म्हणाला, “सत्य काय आहे?” असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला, “ह्याच्या ठायी मला काही अपराध दिसत नाही.

योहान 18:33-38 साठी चलचित्र