तू जो गौरव मला दिला आहेस तो मी त्यांना दिला आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये व तू माझ्यामध्ये; ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवलेस आणि जशी तू माझ्यावर प्रीती केलीस तशी त्यांच्यावरही प्रीती केलीस. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे; ह्यासाठी की, जो माझा गौरव तू मला दिला आहेस तो त्यांनी पाहावा; कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, पण मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवलेस असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यांना कळवले आहे आणि कळवीन; ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केलीस ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
योहान 17 वाचा
ऐका योहान 17
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 17:22-26
4 दिवस
तुम्ही देवाचा आवाज कसा ऐकू शकता ? जागतिक संकटाच्या वेळी देव काय म्हणतो ? या 4 दिवसीय योजनेत, अल्फा संस्थापक निकी गुंबेल काही सोप्या पद्धती सामायिक करून प्रारंभ करतात ज्यामुळे त्याला देवाचे ऐकण्यास मदत होते. तो पुढे तीन प्रमुख आव्हाने सादर करतो की त्याला जाणवते की देव आपल्या सर्वांना प्रतिसाद देण्यासाठी बोलावत आहे: चर्चमधील अधिक ऐक्य, सुवार्तिकतेला प्राधान्य देणे आणि पवित्र आत्म्यावर दररोज अवलंबून राहणे.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ