YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 17:13-19

योहान 17:13-19 MARVBSI

पण आता मी तुझ्याकडे येत आहे; आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस तसे मीही त्यांना जगात पाठवले, आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता स्वतःला समर्पित करतो.

योहान 17:13-19 साठी चलचित्र