YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 11:28-35

योहान 11:28-35 MARVBSI

असे बोलून ती निघून गेली व आपली बहीण मरीया हिला गुप्तपणे बोलावून म्हणाली, “गुरूजी आले आहेत व ते तुला बोलावत आहेत.” हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच होता. जे यहूदी मरीयेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरेकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले. मग येशू होता तेथे मरीया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहूद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला, आणि म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?” ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, येऊन पाहा.” येशू रडला.

योहान 11:28-35 साठी चलचित्र