येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली; पण मरीया घरातच बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता; तरी आताही जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल.” मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.” येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल; आणि जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, हे तू खरे मानतेस काय?” ती त्याला म्हणाली, “होय प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.”
योहान 11 वाचा
ऐका योहान 11
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: योहान 11:20-27
10 दिवस
जून 2021 च्या शेवटी माझी प्रिय पत्नी देवाघरी प्रभूसोबत राहण्यासाठी गेल्यानंतर प्रभु मला शिकवत असलेले हे धडे आहेत. माझी प्रार्थना आहे की तुम्ही जेव्हा ही मनने कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या हृदयाला प्रोत्साहन देण्यासाठी त्याचा उपयोग करील. शोक करणे ठीक आहे. प्रश्न पडायला हरकत नाही. पण दु:खातही आशा आहे. ही तुमच्यासाठी जीवनातील एकमेव अटळ गोष्टीसाठी तयारी असू द्या - ती म्हणजे मृत्यू.
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ