कारण परमेश्वर म्हणतो, ज्या प्रकारे मी ह्या लोकांवर हे सर्व मोठे अरिष्ट आणले आहे त्याच प्रकारे त्यांच्या हितसंबंधाचे जे मी बोललो ते सर्व त्यांना प्राप्त करून देईन. ज्या ह्या देशाविषयी तुम्ही म्हणता की तो ओसाड आहे, त्यात मनुष्य व पशू ह्यांचा मागमूस नाही, तो खास्द्यांच्या हाती गेला आहे, त्या ह्या देशात शेतांची खरेदी होऊ लागेल. बन्यामीन प्रांतात, यरुशलेमेच्या सभोवतालच्या प्रदेशांत, यहूदाच्या नगरांत, डोंगराळ प्रदेशातील नगरांत, मैदानातल्या नगरांत व दक्षिणेकडल्या नगरांत लोक पैसा देऊन शेते घेतील, त्यांची खरेदीखते करतील, त्यांवर शिक्का मारतील व साक्षीदार घेतील; कारण मी त्यांचा बंदिवास उलटवीन असे परमेश्वर म्हणतो.”
यिर्मया 32 वाचा
ऐका यिर्मया 32
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 32:42-44
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ