YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 32:20-24

यिर्मया 32:20-24 MARVBSI

तू मिसर देशात चिन्हे व अद्भुत कृत्ये केलीस; आजवर इस्राएलात व इतर लोकांत ती करीत आला आहेस आणि आज आहे तसे तू आपले नाम केले आहेस. तू चिन्हे व अद्भुत कृत्ये दाखवून समर्थ हाताने व बाहू उभारून मोठी दहशत घालून आपले लोक इस्राएल ह्यांना मिसर देशातून बाहेर आणलेस; आणि तू त्यांच्या पूर्वजांना प्रतिज्ञापूर्वक देऊ केलेला हा देश, ज्यातून दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत असा हा देश त्यांना दिला; त्यांनी येऊन त्याचा ताबा घेतला, परंतु त्यांनी तुझी वाणी ऐकली नाही व तुझ्या नियमशास्त्राप्रमाणे ते चालले नाहीत; तू त्यांना आज्ञापिले त्याप्रमाणे त्यांनी मुळीच केले नाही, म्हणून तू त्यांच्यावर हे सर्व अरिष्ट आणलेस. पाहा, हे नगर घेण्यासाठी त्याला वेढा घालणार्‍यांचे मोर्चे लागले आहेत; तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे ह्यांच्याशी युद्ध करणार्‍या खास्द्यांच्या हाती हे लागले आहे; तू बोललास तसे घडले आहे. पाहा, हे तुला दिसत आहे.