YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 32:16-19

यिर्मया 32:16-19 MARVBSI

मी ते खरेदीखत नरीयाचा पुत्र बारूख ह्याला दिल्यावर परमेश्वराची प्रार्थना केली की, ‘अहा प्रभू परमेश्वरा! पाहा, तू आपल्या महासामर्थ्याने व आपल्या उभारलेल्या बाहूने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली; तुला अवघड असे काही नाही. तू हजारांवर दया करतोस, बापांच्या अन्यायाचे प्रतिफल त्यांच्यामागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालतोस; थोर पराक्रमी देव, सेनाधीश परमेश्वर हे तुझे नाम आहे, तू चातुर्याने थोर व कृतीने पराक्रमी असून प्रत्येकाला ज्याच्या-त्याच्या आचरणाप्रमाणे व कर्मफलाप्रमाणे द्यावे म्हणून मानवजातीचे अखिल मार्ग तुझ्या दृष्टीला खुले आहेत