“सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, ज्या सर्वांना मी यरुशलेमेहून बंदिवान होऊन बाबेलास जायला लावले त्या सर्व बंदिवान झालेल्यांना मी असे म्हणतो : तुम्ही घरे बांधून त्यांत वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा; बायका करून पुत्र व कन्या ह्यांना जन्म द्या; आपल्या पुत्रांना बायका करून द्या व आपल्या कन्यांना नवरे करून द्या, म्हणजे त्यांना पुत्र व कन्या होतील; तुमची तेथे वाढ होऊ द्या, क्षय होऊ देऊ नका. तुम्हांला पकडून ज्या नगरास मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित.
यिर्मया 29 वाचा
ऐका यिर्मया 29
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 29:4-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ