“जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या मेंढरांचा नाश करतात व त्यांना विखरतात ते हायहाय करतील!” असे परमेश्वर म्हणतो. ह्यामुळे माझ्या लोकांना चारणार्या मेंढपाळांविषयी इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझा कळप विखुरला आहे, त्यांना हाकून लावले आहे, त्यांचा समाचार घेतला नाही; पाहा, मी तुमच्या कर्मांचा अनिष्ट परिणाम तुमच्यावर आणून तुमचा समाचार घेईन, असे परमेश्वर म्हणतो. मी ज्या ज्या देशात आपला कळप हाकून लावला त्या त्या देशातून त्याचा अवशेष जमा करीन व त्यांना त्यांच्या मेंढवाड्यात परत आणीन, म्हणजे ते फलद्रूप होऊन वृद्धी पावतील. मी त्यांच्यावर मेंढपाळ नेमीन, ते त्यांना चारतील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. परमेश्वर म्हणतो, पाहा, मी दाविदाकरता एक नीतिमान अंकुर उगववीन; तो राजा होऊन राज्य करील, तो सुज्ञतेने वागेल, देशात न्यायनीतीचा अवलंब करील, असे दिवस येत आहेत. त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे : ‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’ परमेश्वर म्हणतो, ह्यास्तव पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशातून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे म्हणणार नाहीत; तर ‘उत्तर देशांतून व ज्या ज्या देशांत इस्राएल घराण्याच्या संतानाला हाकून लावले होते त्यांतून ज्याने त्यांना आणले त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ,’ असे म्हणतील व ते स्वतःच्या देशात राहतील.”
यिर्मया 23 वाचा
ऐका यिर्मया 23
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यिर्मया 23:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ