YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यिर्मया 1:9-14

यिर्मया 1:9-14 MARVBSI

तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे करून माझ्या मुखाला स्पर्श केला, व तो मला म्हणाला, “पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत; पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमले आहे.” मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, “यिर्मया तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला बदामाच्या1 झाडाची डाहळी दिसते.” परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.” परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, “तुला काय दिसते? मी म्हणालो, “एक उकळती कढई दिसते; तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “देशाच्या सर्व रहिवाशांवर उत्तरेकडून अरिष्ट उद्भवेल.