परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत; इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्यांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्राएल मारील. म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की, ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरट असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे.” तेव्हा त्यांच्यातून बावीस हजार लोक परत गेले आणि दहा हजार राहिले. मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्याबरोबर जावे तर त्याने तुझ्याबरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्याबरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये.” त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ; तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ.” जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते तीनशे भरले; बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्याले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “चाटून पाणी पिणार्या ह्या तीनशे लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे.” मग त्या लोकांनी अन्नसामग्री व लोकांकडली रणशिंगे हाती घेतली; त्याने बाकीच्या सर्व इस्राएल लोकांना आपापल्या डेर्यांकडे पाठवून दिले, पण त्या तीनशे लोकांना मात्र ठेवून घेतले. मिद्यानाची छावणी खाली खोर्यात होती.
शास्ते 7 वाचा
ऐका शास्ते 7
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: शास्ते 7:2-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ