YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6:3-6

शास्ते 6:3-6 MARVBSI

मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत; आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करत व इस्राएलात अन्न, शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे वगैरे काहीएक उरू देत नसत. कारण ते आपले पशू व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत. मिद्यानामुळे इस्राएलाची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला.