YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 3:7-11

शास्ते 3:7-11 MARVBSI

इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले, आपला देव परमेश्वर ह्याला ते विसरले आणि बआल व अशेरा ह्या मूर्तींची सेवा करू लागले; म्हणून इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याने त्यांना अराम-नहराईमचा राजा कुशन-रिशाथईम ह्याच्या हाती दिले, आणि इस्राएल लोकांनी आठ वर्षेपर्यंत कुशन-रिशाथईम ह्याचे दास्य केले. इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज ह्याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडवणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रिशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर चाळीस वर्षे देशाला स्वास्थ्य लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. मवाबाच्या हातांतून एहूद इस्राएलांना सोडवतो