YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 2:16-23

शास्ते 2:16-23 MARVBSI

मग परमेश्वर शास्ते उभे करी व ते त्यांना लुटणार्‍यांच्या हातून सोडवत; तरी ते आपल्या शास्त्यांचे ऐकत नसत; ते व्यभिचारी मतीने अन्य देवांच्या नादी लागून त्यांच्या चरणी लागत. त्यांच्या पूर्वजांनी परमेश्वराच्या आज्ञा पाळून चोखाळलेला मार्ग त्यांनी लवकरच सोडून दिला आणि आपल्या पूर्वजांचे अनुकरण केले नाही. जेव्हा जेव्हा परमेश्वर त्यांच्यासाठी शास्ते उभे करी तेव्हा तेव्हा त्या प्रत्येकाबरोबर परमेश्वर असे आणि त्या शास्त्यांच्या हयातीत तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून वाचवत असे; कारण त्यांच्यावर लोक जुलूम करत व त्यांना गांजत; ह्यामुळे ते कण्हत असत; म्हणून परमेश्वराला त्यांची कीव येई. तरीपण शास्ता मरण पावला म्हणजे ते पुन्हा उलटून अन्य देवांची सेवा करत व त्यांच्या चरणी लागून आपल्या वाडवडिलांपेक्षा अधिक बिघडत; ते आपला दुराचार व दुराग्रह सोडत नसत. तेव्हा इस्राएलावर परमेश्वराचा कोप भडकून तो म्हणाला, “मी ह्या राष्ट्राच्या पूर्वजांशी केलेला करार ह्याने मोडला आहे आणि माझी वाणी ऐकली नाही. म्हणून यहोशवाच्या मृत्युसमयी उरलेल्या राष्ट्रांपैकी कोणालाही मीदेखील येथून पुढे त्यांच्यासमोरून घालवून देणार नाही; पण त्यांच्याकरवी मी इस्राएलाची परीक्षा करीन आणि त्यांचे पूर्वज माझ्या मार्गाने चालत होते त्याप्रमाणेच ते चालतात की नाही हे पाहीन.” म्हणून परमेश्वराने त्या राष्ट्रांना घालवून देण्याची घाई केली नाही; त्यांना राहू दिले आणि त्यांना यहोशवाच्या हाती दिले नाही.