YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 1:27-33

शास्ते 1:27-33 MARVBSI

मनश्शेने बेथ-शान, तानख, दोर, इब्लाम आणि मगिद्दो ह्या नगरांतील व त्यांच्या उपनगरांतील रहिवाशांना घालवून दिले नाही, कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा हट्ट धरला. पुढे इस्राएल समर्थ झाले तेव्हा त्यांनी कनानी लोकांना वेठबिगार करायला लावले; एकदमच हाकून दिले नाही. एफ्राइमाने गेजेर येथे राहणार्‍या कनान्यांना घालवून दिले नाही; ते कनानी गेजेर येथे त्यांच्यामध्येच राहिले. जबुलूनाने कित्रोन व नहलोल येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; तेथील कनानी त्यांच्यामध्ये राहून वेठबिगार करू लागले. अशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोब येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले; कारण त्यांनी त्यांना घालवून दिले नाही. नफतालीने बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवाशांना घालवून दिले नाही; ते त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले; पण बेथ-शेमेश व बेथ-अनाथ येथील रहिवासी त्यांची वेठबिगार करू लागले.