YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 5:16-20

याकोब 5:16-20 MARVBSI

तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता; त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर2 पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले. माझ्या बंधूनो, तुमच्यामधील कोणी सत्यापासून बहकला आणि त्याला कोणी माघारी फिरवले, तर पापी माणसाला त्याच्या चुकलेल्या मार्गापासून जो फिरवतो तो त्याचा जीव मरणापासून3 वाचवील व ‘पापांची’ रास ‘झाकील’, हे ध्यानात ठेवा.