तुमच्यापैकी कोणी दु:ख भोगत आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदात आहे काय? त्याने स्तोत्रे गावीत. तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय? त्याने मंडळीच्या वडिलांना1 बोलवावे आणि त्यांनी प्रभूच्या नावाने त्याला तेल लावावे व त्याच्यावर ओणवून प्रार्थना करावी. विश्वासाची प्रार्थना दुखणाइताला वाचवील आणि प्रभू त्याला उठवील आणि त्याने पापे केली असतील तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यात फार प्रबळ असते. एलीया आपल्यासारख्या स्वभावाचा माणूस होता; त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली, आणि साडेतीन वर्षे पृथ्वीवर2 पाऊस पडला नाही. पुन्हा त्याने प्रार्थना केली; तेव्हा आकाशाने पाऊस पाडला, आणि भूमीने आपले फळ उपजवले.
याकोब 5 वाचा
ऐका याकोब 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: याकोब 5:13-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ