YouVersion लोगो
सर्च आयकॉन

याकोब 4:5-9

याकोब 4:5-9 MARVBSI

“जो आत्मा आपल्या ठायी वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते” हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हांला वाटते काय? तो अधिक ‘कृपा करतो;’ म्हणून शास्त्र म्हणते, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा; अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो व तुमच्या आनंदाचा विषाद होवो.