YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 63:11-14

यशया 63:11-14 MARVBSI

मग त्याच्या लोकांना मोशेच्या वेळचे प्राचीन दिवस आठवले; ते म्हणाले, ज्याने त्यांना त्यांच्या कळपांच्या मेंढपाळांसह समुद्रातून बाहेर आणले तो कोठे आहे? ज्याने आपला पवित्रतेचा आत्मा त्यांच्यात घातला तो कोठे आहे? ज्याने आपला प्रतापी भुज मोशेच्या उजव्या बाजूने चालवला, आपले नाम सर्वकाळ राहावे म्हणून ज्याने त्यांच्यापुढे समुद्र दुभागला, मैदानातून घोडा नेतात तसे त्यांना समुद्राच्या डोहातून अडखळू न देता ज्याने नेले, तो कोठे आहे? खोर्‍यात उतरणार्‍या गुरांप्रमाणे परमेश्वराच्या आत्म्याने त्यांना विश्रांती दिली. ह्या प्रकारे आपले नाम प्रतापी व्हावे म्हणून तू आपल्या लोकांना नेले.