YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 6:2-5

यशया 6:2-5 MARVBSI

त्याच्या भोवताली सराफीम उभे होते; त्या प्रत्येकाला सहा-सहा पंख होते; दोहोंनी तो आपले तोंड झाकी, दोहोंनी आपले पाय झाकी व दोहोंनी उडे. ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”1 घोषणा करणार्‍यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले. तेव्हा मी म्हणालो, “हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो; आणि सेनाधीश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले!”