YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 50:7-10

यशया 50:7-10 MARVBSI

प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही; मी आपले तोंड गारगोटीसारखे केले; माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते. मला नीतिमान ठरवणारा जवळ आहे; माझ्याबरोबर कोण वाद करणार? आपण समोरासमोर उभे राहू, माझा प्रतिवादी कोण असेल त्याने माझ्यापुढे यावे. पाहा, प्रभू परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे, तर मला दोषी कोण ठरवणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील; त्यांना कसर खाऊन टाकील. परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.