YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 40:12-17

यशया 40:12-17 MARVBSI

जलांचे माप आपल्या चुळक्याने कोणी केले आहे? आकाशाचे माप आपल्या वितीने कोणी घेतले आहे? पृथ्वीची धूळ मापाने कोणी मापली आहे? डोंगर काट्याने व टेकड्या तराजूने कोणी तोलल्या आहेत? परमेश्वराच्या आत्म्याचे नियमन कोणी केले आहे? त्याचा मंत्री होऊन त्याला कोणी शिकवले आहे? त्याने कोणाला मसलत विचारली? सन्मार्गाविषयी समज देऊन त्याला कोणी शिक्षण दिले? त्याला कोणी ज्ञान शिकवले? सुज्ञतेचा मार्ग त्याला कोणी दाखवला? पाहा, त्याच्या हिशोबी राष्ट्रे पोहर्‍यांतल्या जलबिंदूसमान, तराजूतल्या रजासमान आहेत; पाहा, द्वीपेही तो धुळीच्या कणांसारखी उचलतो. लबानोन जळणास पुरायचा नाही व त्यावरील वनपशू होमास पुरे पडायचे नाहीत; सर्व राष्ट्रे त्याच्यापुढे काहीच नाहीत; त्याच्या हिशोबी ती अभाव व शून्यता ह्यांहूनही कमी आहेत.