अहो राष्ट्रांनो, ऐकायला जवळ या; लोकांनो कान द्या; पृथ्वी व तिच्यावरील सर्वकाही, जग व त्यात उपजलेले सर्वकाही ऐकोत. कारण परमेश्वराचा कोप सर्व राष्ट्रांवर होत आहे, त्याचा संताप त्यांच्या सर्व सैन्यांवर होत आहे; त्याने त्यांचा सर्वस्वी नाश केला आहे; त्याने त्यांचा वध करण्यास लावले आहे. त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील, त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल व त्यांच्या रक्ताने पर्वत विरघळतील. आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल. कारण माझ्या तलवारीस आकाशात उन्माद चढला आहे; पाहा, शासन करण्यासाठी अदोमावर, ज्या लोकांचा सर्वस्वी नाश करण्याचे मी योजले आहे त्यांच्यावर ती उतरेल. परमेश्वराची तलवार रक्ताने भरली आहे. मांद्याने, कोकरांच्या व बकर्यांच्या रक्ताने, एडक्यांच्या गुर्द्यांच्या मांद्याने पुष्ट झाली आहे; कारण परमेश्वर बसरा येथे यज्ञ, अदोमाच्या देशात महावध करणार आहे. रेडे, रानबैल व गोर्हे हे सर्व त्यांच्याबरोबर पडतील; त्यांच्या रक्ताने त्यांची भूमी भिजून जाईल; तेथली माती मांद्याने भरून जाईल. सीयोनेला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय.
यशया 34 वाचा
ऐका यशया 34
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: यशया 34:1-8
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ