एफ्राइमातील मद्यप्यांच्या दिमाखखोर मुकुटाचा, द्राक्षारसाने झिंगलेल्यांच्या सुपीक खोर्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याचा समूळ नाश होणार.
पाहा, प्रभूच्या हाती मजबूत व समर्थ असा कोणी आहे, तो गारांच्या वृष्टीसारखा, नासाडी करणार्या वादळासारखा, अतिवृष्टीने झालेल्या महापुराच्या झपाट्यासारखा सर्व बलाने तो त्यांच्या गर्वाचा मुकुट भूमीवर झुगारून देत आहे.
एफ्राइमातील मद्यप्यांचा दिमाखखोर मुकुट पायांखाली तुडवतील.
हंगामापूर्वी आगसलेला अंजीर कोणाच्या दृष्टीस पडला म्हणजे तो हाती लागताच त्याने चटकन खाऊन टाकावा, त्याप्रमाणे सुपीक खोर्याच्या माथ्यावरील मोठी शोभा देणारे जे कोमेजणारे फूल त्याची गती होईल.
त्या दिवशी सेनाधीश परमेश्वर, आपल्या अवशिष्ट लोकांना वैभवी मुकुट, शोभिवंत किरीट असा होईल.
न्यायासनावर बसणार्याला न्यायस्फूर्ती, वेशीवर हल्ला करणार्या शत्रूला हटवणार्यांना वीरश्री असा तो होईल.
हेही द्राक्षारसाने भेलकांडत आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; याजक व संदेष्टा हे मद्याने भेलकंडत आहेत, द्राक्षारसाने गुंग झाले आहेत, मद्याने झुकांड्या खात आहेत; ते दृष्टान्त पाहताना भेलकंडतात, निर्णय सांगताना झोके खातात.
सर्व मेजे वांतीच्या घाणीने भरली आहेत, निर्मळ जागाच उरली नाही.
“तो कोणाला ज्ञान शिकवतो? कोणाला संदेश समजावून सांगतो? दूध तुटलेल्यांना काय? थानतुट्या बालकांना काय?
कारण नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; असे तो बोलत असतो.”
तोतर्यांच्या द्वारे परभाषेत तो ह्या लोकांशी बोलेल;
तो त्यांना म्हणाला होता, “ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या; त्याने त्याला आराम होईल,” तरी ते ऐकतना.
ह्यामुळे त्यांना परमेश्वराचा संदेश अशा प्रकारे प्राप्त होईल : नियमावर नियम, नियमावर नियम; कानूवर कानू, कानूवर कानू; थोडे येथे, थोडे तेथे; म्हणजे चालताना ते अडखळून मागे पडतील, भंगतील, पाशात सापडतील, पकडले जातील.