ख्रिस्त हा पुढे होणार्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून, आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वत:चे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला, आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकर्यांचे व बैलांचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील? आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने, सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. कारण मृत्युपत्र असले की मृत्युपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे अवश्य आहे. मृत्यू झाल्यावर मृत्युपत्र अंमलात येते; कारण मृत्युपत्र-कर्ता हयात आहे तोपर्यंत ते कधी अंमलात यायचे नाही. म्हणून पहिल्या कराराचीही स्थापना रक्तावाचून झाली नाही. नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोब वनस्पती व त्यांबरोबर वासरांचे व बकर्यांचे रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करत म्हटले, “परमेश्वराने जो करार तुम्हांला आज्ञापिला त्याचे हे रक्त आहे.” आणि तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे ह्यांवरही रक्त शिंपडले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्वकाही शुद्ध होते, आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही. ह्याप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने अशाने शुद्ध होणे अवश्य होते; प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर ह्यांहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे अवश्य होते. खर्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करायचे नव्हते; तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते; पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त ‘पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी’ एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसर्यांदा दिसेल.
इब्री 9 वाचा
ऐका इब्री 9
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 9:11-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ