YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 3:12-19

इब्री 3:12-19 MARVBSI

बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुमच्यातील कोणाचेही असू नये म्हणून जपा. जोपर्यंत “आज” म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत तुम्ही एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा; हेतू हा की, पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी ‘कठीण होऊ’ नये. कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत. शास्त्रात असे म्हटले आहे, “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका.” कारण ऐकूनही कोणी ‘चीड आणली’? मोशेच्या द्वारे मिसरातून निघालेले सर्वच नव्हेत काय? आणि ‘चाळीस वर्षे तो कोणावर ‘संतापला’? ज्यांनी पाप केले, ‘ज्यांची प्रेते रानात पडली,’ त्यांच्यावर नव्हे काय? आणि ‘शपथ वाहून’ तो कोणाला म्हणाला की, ‘तुम्ही माझ्या विसाव्यात येणार नाही’? ज्यांनी अवज्ञा केली त्यांनाच की नाही? तरी ह्यावरून आपल्याला दिसून येते की, अविश्वासामुळे त्यांना आत येता आले नाही.