आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत ते त्याने देवदूतांच्या अधीन ठेवले नाही. तर एका ठिकाणी कोणी अशी साक्ष दिली आहे, “मर्त्य मानव तो काय की तू त्याची आठवण करावीस? अथवा मानवपुत्र तो काय की तू त्याला दर्शन द्यावेस? तू त्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले आहेस; तू त्याला गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केले आहेस; आणि तू आपल्या हातच्या कृत्यांवर त्याला नेमले आहेस; तू सर्वकाही त्याच्या अधीन — त्याच्या पायांखाली — ठेवले आहेस.” ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ म्हणजे त्याच्या अधीन ठेवलेले नाही असे काही राहू दिले नाहीस; परंतु ‘सर्वकाही त्याच्या अधीन ठेवले आहेस,’ असे अजून आपल्या दृष्टीस पडत नाही खरे. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला ‘देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले होते,’ तो येशू मरण सोसल्यामुळे ‘गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला’ असा आपण पाहतो.
इब्री 2 वाचा
ऐका इब्री 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 2:5-9
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ