YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 13:18-25

इब्री 13:18-25 MARVBSI

आमच्यासाठी प्रार्थना करत राहा; सर्व बाबतींत चांगले वागण्याची आमची इच्छा असून आमचा विवेकभाव चांगला आहे अशी आमची खातरी आहे. आणि तुमच्याकडे माझे परत येणे अधिक लवकर व्हावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा अशी माझी विशेष विनंती आहे. आता ज्या शांतीच्या देवाने ‘सर्वकाळच्या कराराच्या रक्ताने मेंढरांचा’ महान ‘मेंढपाळ’ आपला प्रभू येशू, ह्याला मेलेल्यांतून ‘परत आणले,’ तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणांमध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो व तो आपल्या इच्छेप्रमाणे करण्यास तुम्हांला प्रत्येक चांगल्या कामात सिद्ध करो; त्या येशू ख्रिस्ताला युगानुयुग गौरव असो. आमेन. बंधूंनो, मी तुम्हांला विनंती करतो की, हे बोधवचन ऐकून घ्या; कारण मी तुम्हांला थोडक्यात लिहिले आहे. आपला बंधू तीमथ्य ह्याची सुटका झाली आहे हे तुम्हांला कळावे; तो लवकर आला तर त्याच्याबरोबर मी तुमच्या भेटीस येईन. तुम्ही आपल्या सर्व अधिकार्‍यांना व सर्व पवित्र जनांना सलाम सांगा. इटलीचे बंधू तुम्हांला सलाम सांगतात. तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो.