स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत, घनांधकार, निबिड काळोख, वादळ, कर्ण्याचा नाद व शब्दध्वनी ह्यांच्याजवळ तुम्ही आला नाहीत; तो ध्वनी ऐकणार्यांनी विनंती केली की, त्याच्या योगे आमच्याबरोबर अधिक बोलणे होऊ नये. कारण “पशूदेखील पर्वताला शिवला तर त्याला धोंड्यांनी मारावे,” अशी जी आज्ञा ती त्यांना असह्य झाली. आणि जे दिसले ते इतके भयंकर होते की, मोशे म्हणाला, “‘मी अति भयभीत’ व कंपित ‘झालो आहे.”’ पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत, स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव, पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे, नव्या कराराचा मध्यस्थ येशू, आणि शिंपडण्याचे रक्त ह्यांच्याजवळ आला आहात; त्या रक्ताचे बोलणे हाबेलाच्या रक्ताच्या बोलण्यापेक्षा उत्तम आहे. जो बोलत आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा; कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणार्याचा अवमान करणारे जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणार्यापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही. त्या वेळेस त्याच्या वाणीने पृथ्वी हलवली; परंतु त्याने दिलेले वचन आता असे आहे की, “‘आणखी एकदा मी’ केवळ ‘पृथ्वी’ नव्हे तर ‘आकाशही कापवीन.”’ “आणखी एकदा” ह्याचा अर्थ असा होतो की, घडवलेल्या वस्तूंप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील; ते ह्यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात. म्हणून न हलवता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्याकारणाने आपण उपकार मानू; तेणेकरून देवाला संतोषकारक1 होईल अशी त्याची सेवा, आदर व भय धरून करू
इब्री 12 वाचा
ऐका इब्री 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: इब्री 12:18-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ