YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इब्री 10:12-20

इब्री 10:12-20 MARVBSI

परंतु पापांबद्दल सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून हा ‘देवाच्या उजवीकडे बसला आहे;’ आणि तेव्हापासून ‘आपले वैरी आपले पदासन होईपर्यंत’ वाट पाहत आहे. कारण पवित्र होणार्‍यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे. पवित्र आत्माही आपल्याला साक्ष देतो, कारण हे म्हटल्यावर, परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर जो करार मी त्यांच्याबरोबर करीन तो हा : मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन, आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.” आणि “त्यांची पापे व त्यांचे स्वैराचार मी ह्यापुढे आठवणारच नाही.” तर मग जेथे त्यांची क्षमा झाली तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे राहिले नाही. म्हणून बंधुजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे