YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हाग्गय 2:15-19

हाग्गय 2:15-19 MARVBSI

आजपासून मागची, म्हणजे परमेश्वराच्या मंदिराचा दगडावर दगड रचण्यापूर्वीची, जी स्थिती होती तिच्याकडे लक्ष पुरवा; त्या सर्व दिवसांत कोणी वीस मापे धान्याच्या राशीकडे गेला तर त्याच्या हाती दहा लागत; द्राक्षकुंडांतून पन्नास पात्रे भरून काढण्यास गेला तर त्याला वीसच मिळत. मी तुमच्यावर, तुमच्या हातच्या सर्व कामांवर तांबेरा, भेरड व गारा ह्यांचा मारा केला; तरी तुमच्यातला एकही माझ्याकडे वळला नाही, असे परमेश्वर म्हणतो. ह्यास्तव आजपासून मागच्या म्हणजे नवव्या महिन्याच्या चोविसाव्या तारखेस परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला त्या मागच्या काळाकडे लक्ष पुरवा. कोठारांत काही धान्य आले आहे काय? द्राक्षलता, अंजिराचे झाड, डाळिंब व जैतून ह्यांना काही फळ आले नाही. आजच्या दिवसापासून मी तुम्हांला आशीर्वाद देईन.”