YouVersion लोगो
सर्च आयकॉन

हाग्गय 2:1-9

हाग्गय 2:1-9 MARVBSI

सातव्या महिन्याच्या एकविसाव्या दिवशी हाग्गय संदेष्ट्याच्या द्वारे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे : आता यहूदाचा प्रांताधिकारी शल्तीएल ह्याचा पुत्र जरूब्बाबेल, मुख्य याजक यहोसादाक ह्याचा पुत्र यहोशवा आणि अवशिष्ट लोक ह्यांना असे विचार : ‘ज्याने ह्या मंदिराचे पूर्वीचे वैभव पाहिले आहे असा तुमच्यामध्ये कोणी उरला आहे काय? आता त्याची काय दशा तुम्हांला दिसते? ते शून्य झाले आहे असे तुमच्या नजरेस पडत नाही काय? हे जरूब्बाबेला, हिम्मत धर,’ असे परमेश्वर म्हणतो; ‘हे मुख्य याजका, यहोसादाकाच्या पुत्रा यहोशवा, हिम्मत धर; परमेश्वर म्हणतो, देशातल्या सर्व रहिवाशांनो, हिम्मत धरा व कामास लागा; मी तुमच्याबरोबर आहे असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही मिसर देशातून निघालात तेव्हा तुमच्याबरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठायी कायम आहे; तुम्ही भिऊ नका. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन, ही हलवून सोडीन; मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रांतील निवडक वस्तू येतील;1 आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी ह्या स्थळाला शांती देईन,”’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.