YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 42:1-6

उत्पत्ती 42:1-6 MARVBSI

याकोबाने ऐकले की, मिसर देशात धान्य आहे; तेव्हा तो आपल्या मुलांना म्हणाला, “तुम्ही एकमेकांच्या तोंडाकडे का पाहत राहिला आहात?” मग तो म्हणाला, “पाहा, मिसरात धान्य आहे असे मी ऐकतो; तुम्ही तेथे जाऊन आपल्यासाठी धान्य विकत आणा, म्हणजे आपण जगू, मरणार नाही.” मग योसेफाचे दहा भाऊ धान्य खरेदी करण्यासाठी खाली मिसर देशात गेले. तथापि योसेफाचा भाऊ बन्यामीन ह्याला याकोबाने त्याच्या भावांबरोबर पाठवले नाही; “कारण” तो म्हणाला, “कदाचित त्याला एखादा अपाय व्हायचा.” ह्याप्रमाणे इस्राएलाचे मुलगे इतर लोकांबरोबर धान्य खरेदी करण्यास आले; कारण कनान देशात दुष्काळ पडला होता. योसेफ त्या देशाचा मुख्य अधिकारी होता, आणि देशातल्या सर्व लोकांना तोच धान्य विकत असे. योसेफाच्या भावांनी येऊन जमिनीपर्यंत लवून त्याला मुजरा केला.