तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्याला मिसर देशावर नेमावे; आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या सात वर्षांत मिसर देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा. ह्या येणार्या सुकाळाच्या वर्षांत सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा. मिसर देशावर दुष्काळाची जी सात वर्षे येणार त्यांसाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.” हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले. तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, “ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे असा ह्या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय?” मग फारो योसेफाला म्हणाला, “देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही. तर तू माझ्या घराचा अधिकारी हो; तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा.”
उत्पत्ती 41 वाचा
ऐका उत्पत्ती 41
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 41:33-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ