YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 4:3-7

उत्पत्ती 4:3-7 MARVBSI

काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांच्यातल्या पुष्ट मेंढरांतून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण ह्यांचा आदर केला; पण काइन व त्याचे अर्पण ह्यांचा त्याने आदर केला नाही; म्हणून काइन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काइनाला म्हणाला, “तू का संतापलास? आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केलेस तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाहीस तर दाराशी पाप टपूनच आहे; त्याचा रोख तुझ्यावर आहे. ह्याकरता तू त्याला दाबात ठेव.”