YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 39:1-4

उत्पत्ती 39:1-4 MARVBSI

इकडे योसेफाला मिसरात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिसर्‍याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली; योसेफ त्याची सेवा करू लागला; आणि त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी नेमून आपले सर्वकाही त्याच्या ताब्यात दिले.