इकडे योसेफाला मिसरात नेले तेव्हा ज्या इश्माएली लोकांनी त्याला तेथे नेले होते त्यांच्यापासून त्याला पोटीफर नावाच्या एका मिसर्याने विकत घेतले; तो फारोचा एक अंमलदार असून गारद्यांचा सरदार होता. परमेश्वर योसेफाबरोबर असल्याकारणाने तो यशस्वी पुरुष झाला; तो आपल्या मिसरी धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्याकारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले.
उत्पत्ती 39 वाचा
ऐका उत्पत्ती 39
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 39:1-3
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ