याकोब कनान देशात वस्ती करून राहिला; तेथेच त्याचा बापही उपरा म्हणून राहिला होता. याकोब वंशाचा वृत्तान्त1 हा : योसेफ सतरा वर्षांचा असताना आपल्या भावांबरोबर कळप चारत असे; तो आपल्या बापाच्या स्त्रिया बिल्हा व जिल्पा ह्यांच्या मुलांबरोबर असे; तेव्हा त्याने त्यांच्या दुर्वर्तनाविषयीची खबर आपल्या बापाला दिली. इस्राएल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर फार प्रीती करत असे, कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता; त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याचे भाषण करीनासे झाले. योसेफाला एक स्वप्न पडले, ते त्याने त्यांना सांगितले तेव्हा तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. तो त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न ऐका : पाहा, आपण शेतात पेंढ्या बांधत होतो तेव्हा माझी पेंढी उठून उभी राहिली; तेव्हा तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीसभोवती येऊन उभ्या राहिल्या व त्यांनी तिला नमन केले.” हे ऐकून त्याचे भाऊ त्याला म्हणाले, “काय, तू आमच्यावर राज्य करणार? तू आमच्यावर सत्ता चालवणार?” आणि त्याच्या स्वप्नांमुळे व भाषणामुळे तर ते त्याचा अधिकच द्वेष करू लागले. पुढे त्याला आणखी एक स्वप्न पडले, तेही त्याने आपल्या भावांना सांगितले, तो म्हणाला, “पाहा, मला आणखी एक स्वप्न पडले, ते असे की, सूर्य, चंद्र व अकरा तारे ह्यांनी मला नमन केले.” त्याने हे स्वप्न आपल्या बापाला व भावांना सांगितले. तेव्हा त्याचा बाप त्याला धमकावून म्हणाला, “हे कसले स्वप्न तुला पडले? काय, मी, तुझी आई व तुझे भाऊ हे भूमीपर्यंत लवून तुला नमन करण्यासाठी तुझ्यापुढे येणार?” त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले, पण त्याचे म्हणणे बापाने मनात ठेवले. योसेफाला मिसर देशात विकून टाकतात
उत्पत्ती 37 वाचा
ऐका उत्पत्ती 37
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 37:1-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ