YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 31:1-9

उत्पत्ती 31:1-9 MARVBSI

नंतर याकोबाच्या कानावर लाबानाच्या मुलांचे असे म्हणणे आले की, आमच्या बापाचे होते नव्हते ते सर्व याकोबाने लुबाडले आहे, आणि आमच्या बापाच्या सर्वस्वातून त्याने ही सर्व धनदौलत मिळवली आहे. लाबान पूर्वीप्रमाणे आपल्यावर प्रसन्न नाही असे याकोबाने ताडले. परमेश्वराने याकोबाला सांगितले की, “तू आपल्या पूर्वजांच्या देशी, आपल्या आप्तांकडे परत जा, मी तुझ्याबरोबर असेन.” तेव्हा याकोबाने राहेल व लेआ ह्यांना निरोप पाठवून शेतात आपल्या कळपाकडे बोलावले. त्या आल्यावर तो त्यांना म्हणाला, “तुमच्या बापाच्या चर्येवरून मी ताडले की, तो पूर्वीप्रमाणे माझ्यावर प्रसन्न नाही, तथापि माझ्या वाडवडिलांचा देव माझ्याबरोबर आहे. मी सर्व बळ खर्चून तुमच्या बापाची चाकरी केली हे तुम्हांला ठाऊक आहे; तरी तुमच्या बापाने मला फसवून दहादा माझ्या वेतनात फेरबदल केला, पण देवाने त्याला माझी काही हानी करू दिली नाही. त्याने जेव्हा म्हटले की, ‘ठिपकेदार शेळ्यामेंढ्या तुला वेतनादाखल मिळतील,’ तेव्हा सर्व कळपांना ठिपकेदार पोरे होऊ लागली; त्याने जेव्हा म्हटले की, ‘बांड्या तुझ्या,’ तेव्हा सर्व कळपांना बांडी पोरे होऊ लागली. ह्या प्रकारे देवाने तुमच्या बापाची जनावरे हिरावून मला दिली आहेत.