इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले; तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पावून मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी ह्यांचा धनी झाला; तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत त्याच्या चाकरांनी ज्या विहिरी खणल्या होत्या त्या सर्व पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या. अबीमलेख इसहाकाला म्हणाला, “तू आमच्यातून निघून जा, कारण तू आमच्याहून फारच सामर्थ्यवान झाला आहेस.” तेव्हा इसहाक तेथून निघाला आणि गरार खोर्यात डेरा देऊन तेथे राहिला. आणि त्याचा बाप अब्राहाम ह्याच्या हयातीत ज्या विहिरी खणल्या होत्या व ज्या त्याच्या मृत्यूनंतर पलिष्ट्यांनी बुजवून टाकल्या होत्या, त्या त्याने पुन्हा उकरल्या, आणि त्याच्या बापाने जी नावे दिली होती तीच त्याने त्यांना पुन्हा दिली.
उत्पत्ती 26 वाचा
ऐका उत्पत्ती 26
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 26:12-18
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ