रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो, त्या झर्याजवळ परमेश्वराच्या दूताला ती आढळली. तो म्हणाला, “हे सारायच्या दासी हागारे, तू आलीस कोठून व जातेस कोठे?” ती म्हणाली, “माझी धनीण साराय हिच्यापासून मी पळून जात आहे.” परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तू आपल्या धनीणीकडे परत जा आणि तिच्या हाताखाली तिचे सोशीत राहा.” परमेश्वराचा दूत तिला म्हणाला, “तुझी संतती मी वाढवीनच वाढवीन, एवढी की तिची गणती करता येणार नाही.” परमेश्वराचा दूत तिला आणखी म्हणाला, “पाहा, तू गर्भवती आहेस, तुला मुलगा होईल, त्याचे नाव इश्माएल ठेव; कारण परमेश्वराने तुझा आक्रोश ऐकला आहे. तो रानगाढवासारखा मनुष्य होईल, त्याचा हात सर्वांवर चालेल, व सर्वांचा हात त्याच्यावर चालेल; तो आपल्या सर्व भाऊबंदांच्या देखत पूर्वेस वस्ती करील.” तिच्याशी बोलणार्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता-एल-रोई (तू पाहणारा देव) असे ठेवले; ती म्हणाली, “मला पाहणार्याला मी ह्याही ठिकाणी मागून पाहिले काय?” ह्यावरून त्या विहिरीचे नाव बैर-लहाय-रोई (मला पाहणार्या जिवंताची विहीर) असे पडले; कादेश व बेरेद ह्यांच्या दरम्यान ही विहीर आहे.
उत्पत्ती 16 वाचा
ऐका उत्पत्ती 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 16:7-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ