तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली; आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, “माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी; मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे, परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो.” अब्राम सारायला म्हणाला, “पाहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर.” मग साराय तिचा जाच करू लागली, तेव्हा ती तिला सोडून पळून गेली.
उत्पत्ती 16 वाचा
ऐका उत्पत्ती 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 16:4-6
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ