YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 16:1-4

उत्पत्ती 16:1-4 MARVBSI

अब्रामाला आपली बायको साराय हिच्यापासून काही मूलबाळ झाले नव्हते; तिला हागार नावाची एक मिसरी दासी होती. साराय अब्रामाला म्हणाली, “पाहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे; तर माझ्या दासीपाशी जा; कदाचित तिच्याकडून माझे घर नांदते होईल,” तेव्हा अब्रामाने साराय हिचा शब्द मान्य केला. अब्रामाला कनान देशात राहून दहा वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम ह्याला आपली मिसरी दासी हागार ही बायको म्हणून नेऊन दिली. तो हागारेपाशी गेला व ती गर्भवती झाली; आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीण तुच्छ वाटू लागली.