अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व गणला. तो त्याला म्हणाला, “तुला हा देश वतन द्यावा म्हणून खास्द्यांच्या ऊर गावातून ज्याने तुला आणले तो मीच परमेश्वर आहे.” तो म्हणाला, “प्रभू परमेश्वरा, मला हे वतन मिळेल हे कशावरून?” त्याने त्याला सांगितले, “तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका, एक होला आणि पारव्याचे एक पिलू माझ्यासाठी घे.” त्याने ती सर्व घेतली व मधोमध चिरून त्यांचे दोन-दोन तुकडे केले आणि प्रत्येकाचे तुकडे समोरासमोर ठेवले; पक्षी मात्र त्याने मधोमध चिरले नाहीत. त्या शवांवर हिंस्र पक्ष्यांनी झडप घातली, तेव्हा त्यांना अब्रामाने हाकून दिले. सूर्यास्ताच्या सुमारास अब्रामाला गाढ निद्रा लागली तेव्हा घोर भीती, निबिड अंधकार त्याच्यावर पडला. परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू निश्चितपणे समज की जो देश स्वत:चा नाही, अशा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांचे दास्य करील, आणि ते लोक चारशे वर्षे त्यांना छळतील. मग ज्या राष्ट्राचे दास्य ते करतील त्याचे मी पारिपत्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील; चांगला म्हातारा झाल्यावर तुला मूठमाती देतील. तुझ्या चौथ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्यापि भरला नाही. नंतर सूर्य मावळला आणि निबिड अंधकार पडला, तेव्हा असे झाले की धुमसती आगटी व जळती मशाल त्या शवांच्या तुकड्यांमधून जाताना दिसली. त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाशी करार करून सांगितले, “मिसराच्या1 नदीपासून ते महानदी फरात येथ-पर्यंतचा प्रदेश मी तुझ्या संतानास देतो. केनी, कनिज्जी, कदमोनी
उत्पत्ती 15 वाचा
ऐका उत्पत्ती 15
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 15:6-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ