YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 12:1-5

उत्पत्ती 12:1-5 MARVBSI

परमेश्वराने अब्रामाला सांगितले, “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा; मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन; तू आशीर्वादित होशील; तुझे जे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन; तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन; तुझ्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील.” परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याच्याबरोबर लोट गेला; हारान येथून निघतेवेळी अब्रामाचे वय पंचाहत्तर वर्षांचे होते. आपली बायको साराय, पुतण्या लोट, त्यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे घेऊन अब्राम कनान देशात जायला निघाला व कनान देशात ते जाऊन पोहचले.