कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला. तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून ‘निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे. शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत. त्या देशातून तो पुढे अश्शूरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ-ईर व कालह ही वसवली; तसेच निनवे व कालह ह्यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसवले; हेच ते मोठे शहर होय.
उत्पत्ती 10 वाचा
ऐका उत्पत्ती 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्पत्ती 10:8-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ