हामाचे मुलगे : कूश, मिस्राईम, पूट व कनान.
कूशाचे मुलगे : सबा, हवीला, साब्ता, रामा व साब्तका; आणि रामाचे मुलगे : शबा व ददान.
कूशाला निम्रोद झाला; तो पृथ्वीवर महारथी होऊ लागला.
तो परमेश्वरासमोर बलवान पारधी झाला, म्हणून ‘निम्रोदासारखा परमेश्वरासमोर बलवान पारधी’ असे म्हणण्याचा प्रघात आहे.
शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत.
त्या देशातून तो पुढे अश्शूरास गेला व त्याने निनवे, रहोबोथ-ईर व कालह ही वसवली;
तसेच निनवे व कालह ह्यांच्या दरम्यान त्याने रेसन शहर वसवले; हेच ते मोठे शहर होय.
मिस्राईम ह्याला लूदीम, अनामीम, लहाबीम, नाप्तुहीम,
पात्रुसीम, कास्लूहीम (ह्यांच्यापासून पलिष्टी झाले) व कफतोरी हे झाले.
कनान ह्याला सीदोन हा पहिला मुलगा आणि हेथ,
यबूसी, अमोरी, गिर्गाशी,
हिव्वी, आर्की, शीनी,
अर्वादी, समारी व हमाथी हे झाले; पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला.
कनान्यांची सीमा सीदोनाहून गरारास जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम ह्यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती.
कुळे, भाषा, देश व राष्ट्रे ह्यांपरत्वे वर सांगितलेली हामाची ही संतती आहे.